
पूर्व भाद्रपदा नक्षत्र
नक्षत्र तथ्ये
| वैशिष्ट्य | तपशील |
|---|---|
| प्रमाण | 20°00′ मकर ते 6°40′ मीन |
| प्रतीक | दोन चेहरे असलेला मनुष्य, तलवार |
| स्वामी ग्रह | गुरू |
| प्रवृत्ती | मनुष्य |
| प्राथमिक प्रेरणा | अर्थ |
| प्राणी प्रतीक | नर सिंह |
| दिशा | पश्चिम |
| ध्वनी | से, सो, दा, दी |
| गुणधर्म | सत्व/सत्व/रजस |
| देवता | अज एकपाद |
पूर्व भाद्रपदा नक्षत्राची वैशिष्ट्ये
पूर्व भाद्रपदा हे मकर आणि मीन राशींच्या नक्षत्रात येते, ज्यांचे स्वामी अनुक्रमे शनी आणि गुरु आहेत. या नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरु आहे. एकादश रुद्रांपैकी एक असलेले अजएकपाद हे पूर्व भाद्रपदाचे देवता आहेत. दोन चेहरे असलेला मनुष्य किंवा तलवार हे या नक्षत्राचे प्रतीक आहे. हे नक्षत्र आध्यात्मिक आकांक्षांचे प्रतिनिधित्व करते. हे बदल आणि परिवर्तनाचे नक्षत्र आहे.
पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती दयाळू असतात आणि सर्वांना मदत करतात. त्यांचा दृष्टिकोन मानवतावादी असतो आणि त्या इतरांना कधीही दुखावत नाहीत. त्या व्यापक विचारसरणीच्या असतात आणि विद्वान व्यक्ती म्हणून समोर येतात. त्या प्रामाणिक, दृढनिश्चयी आणि कष्टाळू व्यक्ती असतात. त्या बुद्धिमत्ता, तीक्ष्ण बुद्धी आणि आयुष्यातील उत्तम गुणांनी समृद्ध असतात.
या व्यक्ती आध्यात्मिक असतात आणि दैवी शक्तीवर त्यांची गाढ श्रद्धा असते. पण त्या धार्मिक विधींच्या अंध पाठीराख्या नसतात आणि वास्तविक/व्यावहारिक जीवनात त्यांच्या उपयुक्ततेबद्दल खात्री पटल्यावरच त्या विधी करतात. त्या चांगल्या निर्णयक्षमता असणाऱ्या असतात आणि योग्य अन् अयोग्य यातील फरक जाणतात. त्यांना मेहनत करावी लागू शकते पण शेवटी त्या लोकांमध्ये समृद्धी आणि आदर मिळवतात.
पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती स्वतंत्र असतात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य जगतात. त्यांना वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो आणि मेहनत करावी लागू शकते. 24 ते 33 वयोगटादरम्यान तुमची संथ पण सातत्यपूर्ण प्रगती होईल. तुमचा सर्वोत्तम काळ तुमच्या 40 व्या वाढदिवसानंतर सुरू होतो आणि तुम्ही साधारण 54 वर्षांचे होईपर्यंत तुमची प्रगती होत राहील.
पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये उत्तम बुद्धिमत्ता असते. त्या खऱ्या अर्थाने व्यावसायिक असतात आणि त्यांना आदर व समृद्धी मिळते. याशिवाय, त्यांना विविध विषयांचे ज्ञान असते आणि त्या जे काही काम हाती घेतात त्यात त्या उत्तम कामगिरी करतात.
एकंदरीत, या नक्षत्राच्या व्यक्ती दयाळू, उदार आणि प्रेमळ असतात. उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्या धाडसी असतात आणि इतरांसाठी व त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहतात. त्या नेहमी गरजूंना मदतीचा हात देतात आणि अनेकांकडून त्यांना पसंत व कौतुक केले जाते.
पूर्व भाद्रपदा करिअरच्या आवडी
ज्योतिषी, गूढ शास्त्रज्ञ (ऑकल्टिस्ट), संशोधक, पुजारी, गणितज्ञ, बँकिंग, शासकीय सेवा
पूर्व भाद्रपदा आरोग्याच्या समस्या
घोटे आणि पायांना सुज येणे, ॲसिडिटी, मज्जासंस्थेचे विकार, अर्धांगवायू (पॅरालिसिस), बरगड्यांच्या समस्या
पूर्व भाद्रपदा नक्षत्र सुसंगतता (काँपॅटिबिलिटी)
आदर्श जोडीदार: उत्तराभाद्रपद
सर्वात आव्हानात्मक जीवनसाथी: ज्येष्ठा
कर्म आणि भाग्य
कर्म आणि भाग्याच्या संदर्भात, पूर्व भाद्रपदा नक्षत्र हे तीव्र परिवर्तन आणि आध्यात्मिक जागृतीच्या प्रवासाचे प्रतीक आहे. हे आयुष्यातील अशा टप्प्यांचे प्रतिनिधित्व करते जिथे भूतकाळातील कर्म तीव्र आत्मपरीक्षणास आणि आध्यात्मिक सत्याचा शोध घेण्यास प्रोत्साहन देते.
पूर्व भाद्रपद नक्षत्राने प्रभावित असलेले लोक ऐहिक सीमांच्या पलीकडे जाऊन आणि आध्यात्मिक मुक्ती मिळवून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरित होतात. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात त्याग, आध्यात्मिक शिस्त आणि अंतर्गत वाढीची परिवर्तनकारी शक्ती या गोष्टी शिकण्याचा समावेश असतो, ज्यामुळे शेवटी त्यांचे सखोल वैयक्तिक आणि आध्यात्मिक परिवर्तन होते.
पूर्व भाद्रपद नक्षत्राचे चांगले गुण वाढवण्यासाठी उपाय
अज एकपाद यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि या नक्षत्राचे परिवर्तनकारी व आध्यात्मिक गुण वाढवण्यासाठी "Om Aja Ekapadaya Namah" या मंत्राचा जप करा.
पूर्व भाद्रपद नक्षत्राची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि ज्ञान, आध्यात्मिक दृष्टी व अंतर्गत शक्ती वाढवण्यासाठी पिवळा पुखराज परिधान करा.
नक्षत्र चरण
प्रथम चरण
मंगळ हा पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणाचा स्वामी आहे, जो मेष नवमांश राशीत येतो. हे लोक धाडसी असतात आणि त्यांच्यात मानसिक आक्रमकता जास्त असते. त्यांनी त्यांच्या आक्रमकतेवर योग्य नियंत्रण ठेवून तिला योग्य दिशा दिली पाहिजे.
द्वितीय चरण
शुक्र हा पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणाचा स्वामी आहे, जो वृषभ नवमांश राशीत येतो. हे लोक ऐहिक सुखांनी समृद्ध असतात. ते दृढनिश्चयी आणि आशावादी असतात. ते त्यांच्या गडद (डार्क) बाजूचा शोध घेऊ शकतात आणि त्यात गुंतू शकतात.
तृतीय चरण
बुध हा पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे, जो मिथुन नवमांश राशीत येतो. या लोकांचा स्वभाव शांत आणि मनमोकळा असतो. ते सुशिक्षित, धार्मिक असतात आणि सहज खचून जात नाहीत.
चतुर्थ चरण
चंद्र हा पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या चौथ्या चरणाचा स्वामी आहे, जो कर्क नवमांश राशीत येतो. या लोकांना सुखाची आवड असते आणि त्यांना इतरांच्या कामात अडथळा आणायला आवडत नाही. त्यांच्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात.
